
Zilla Parishad Bharti तील आरोग्य विभागाशी संबंधित (Department of Health) पदे वगळता इतर संवर्गातील पदांबाबत वित्त विभागाच्या संदर्भ क्र.५ वरील दि.३० सप्टेंबर, २०२२ च्या शासन निर्णयातील सूचनांनुसार विभागाचा सुधारित आकृतिबंध अंतिम होऊन त्यास शासनाची मान्यता मिळाल्याशिवाय पदभरती करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. Zilla Parishad Bharti
Zilla Parishad Bharti
आता संदर्भ क्र.७ येथील वित्त विभागाच्या दि.३१ ऑक्टोबर, २०२२ च्या शासन निर्णयानुसार ज्या विभाग / कार्यालयांचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभाग / कार्यालयांतील गट-अ, गट-ब व गट-क मधील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आलेली आहे. सदर सूचनांस अनुसरून ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषदेच्या गट-क संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) पदभरती करण्याकरिता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
हेही वाचा :MSRTC Nashik Bharti 8 आणि 10 वी पास उमेदवारांना ST महामंडळ मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी
त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या शासन निर्णय दि. ३० सप्टेंबर, २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येईल. २. जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत भरण्याबाबत सुधारित कालबद्ध कार्यक्रम (परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक) निश्चित करण्यात येवून प्रपत्र – १ मध्ये जोडण्यात आले आहे.

हेही वाचा : Bank of Maharashtra Recruitment बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांच्या 255 जागांसाठी नवीन भरती
सदर कालबद्ध कार्यक्रमाचे सर्व जिल्हा परिषदांनी तंतोतंत पालन करावे. त्याकरिता रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेणे (ऑनलाइन/ऑफलाइन) इ. तदनुषंगिक परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची राहील.
1 thought on “Zilla Parishad Bharti 2023 तब्बल! 84,000 हजार जागांसाठी अर्ज सुरू”