Voter ID Card list: आपल्या गावाची मतदान यादी पहा आपल्या मोबाईल वर फक्त एका क्लिक वर.

Floating Telegram Join Channel

Voter ID Card list: नमस्कार मित्रानो आपणास या बातमीमध्ये पाहणार आहोत की आपल्या गावाची मतदान यादी (Voter ID Card list) आपण मोबाईलवर कशी पाहू शकतो. त्या मतदान यादी मध्ये आपले नाव आहे का? किंवा आपले नाव मतदान यादीत कसे जोडायचे अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.हा लेख सविस्तर वाचा या लेख मधे स्टेप by स्टेप यदि कशी पहायची या बदल सविस्तर माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात 14 हजार 234 इतक्या गावांमध्ये 15 जानेवारीला मतदान होईल, तर 18 जानेवारीला निकाल लागेल.

पण, मतदान करायचं म्हटलं तर गावातील मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही, तसंच आपल्या वॉर्डातील उमेदवार आणि त्याची माहिती जसं की नाव, शिक्षण, गुन्हे, संपत्ती याची माहिती असणं आवश्यक असतं.

हीच माहिती घरबसल्या कशी पाहायची, हे आपण आता जाणून घेऊया.

how to download voter card list how to download voter card pdf can i download voter card online how to download voter card with photo

मतदार यादी कशी पाहायची?

मतदार यादी पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला ceo.maharashtra.gov.in हा पत्ता टाईप करावा लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर मुख्य निवडणूक अधिकारी ही वेबसाईट ओपन होईल.

या वेबसाईटवरील उजवीकडच्या Go to New Website या पर्यायावर क्लिक केलं की एक नवीन पेज ओपन होईल.

 

या पेजवरील निवडणूक यादी (विभागनिहाय) पीडीएफ या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.


त्यानंतर यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि गावाचं नाव निवडायचं आहे.


आणि मग कॅप्चा टाकायचा आहे. म्हणजे काय तर समोरच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी तुम्हाला इथं टाकायची आहे.


त्यानंतर Open PDF यावर क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदार यादी ओपन होते.

मतदार यादी-2021 असं या यादीचं शीर्षक असतं. इथं सुरुवातीला तुमचं गाव ज्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात येतं त्या मतदारसंघाचं नाव, क्रमांक आणि आरक्षणाची स्थिती दिलेली असते.


पुढे मतदान केंद्राच्या तपशीलात मतदान केंद्राचं नाव, क्रमांक आणि पत्ता दिलेला असतो आणि त्यानंतर मतदारांची संख्या (महिला, पुरुष, तृतीयपंथी) दिलेली असते.


त्यानंतर गावातील मतदारांच्या नावाची यादी दिलेली असेत. यात मतदाराचं नाव, पती किंवा वडिलांचं नाव, घर क्रमांक, वय, लिंग ही माहिती दिलेली असते. अशा पद्धतीनं तुम्ही या यादीत तुमचं नाव शोधू शकता.

हे वाचले का तुम्ही -👇👇

Leave a Comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा