
Soybean Rate २०२३ कृषी उत्पन्न बाजार समिती (हिंगोली एपीएमसी) अंतर्गत शुक्रवारी (ता. 20) धान्य बाजारात (भुसार मार्केट) 900 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनचा प्रति क्विंटल दर किमान 4800 ते कमाल 5350 रुपये आणि सरासरी दर 5052 रुपये आहे.
हिंगोली धान्य बाजारात मंगळवार (ता. 16) ते शुक्रवार (ता. 20) अशी एकूण 3 हजार 25 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीन बियाणांची किंमत 4800 ते 5400 रुपये आहे.

Soybean Rate २०२३
गुरुवारी (दि. 19) सोयाबीनची 800 क्विंटल आवक झाली असताना, प्रतिक्विंटल दर 4850 ते 5360 रुपये, तर सरासरी दर 5000 रुपये होता. बुधवारी (ता. 18) सोयाबीनची 525 क्विंटल आवक झाली असून, प्रतिक्विंटल दर 4900 ते रु.
मंगळवारी (ता. 17) सोयाबीनची 800 क्विंटल आवक झाली असताना, दर प्रतिक्विंटल 5005 ते 5400 रुपये, तर सरासरी दर 5202 रुपये होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनचे दर थोडे कमी झाले आहेत. परिणामी आवकही थोडी कमी झाली आहे.