Whatsapp ग्रुप जॉईन करा

Soyabin Bajar Bhav : सोयाबीन दर तेजीतच इथे पहा नवीन दर

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

Soyabin Bajar Bhav नमस्कार शेतकरी मित्रानो देशात सध्या सोयाबीनच्या दर (Soybean Rate) वाढलेले आहेत. मात्र तरीही बाजारात आवक नाही. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात (Soybean Market) बाजारातही सोयाबीन दर सुधारलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाि सोयाबीन दरात आणखी वाढ होणयाची आशा आहे. सध्या देशातील बाजारात सोयाबीन सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ८०० रुपये दर मिळत आहे.


जगात ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटीना हे महत्वाचे सोयाबीन उत्पादक देश आहेत. यंदा ब्राझील आणि अर्जेंटीना या देशांमध्ये सोयाबीन उत्पादन विक्रमी पातळीवर पोचण्याचा अंदाज व्यक्त होतोय. त्यामुळं जागतिक सोयाबीन उत्पादनात ३४९ लाख टनांची वाढ होईल, असा अंदाज युएसडीएनं व्यक्त केला आहे.

Soyabin Bajar Bhav

युएसडीएच्या मते यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन ३ हजार ९०० लाख टनांवर पोचेल. मात्र यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत शिल्लक साठा कमी आहे. त्यामुळं सोयाबीनचा एकूण पुरवठा ४ हजार ८५२ लाख टनांवर होईल. तसंच यंदा जगात ३ हजार २९३ लाख टन सोयाबीनचं गाळप होण्याचा अंदाज आहे. तर जगात एकूण ३ हजार ८०२ लाख टन सोयाबीनचा वापर होणार आहे, असाही अंदाज युएसडीएनं व्यक्त केला आहे.

Soyabin Bajar Bhav

हे वाचा – कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के अनुदान लगेच करा ऑनलाईन अर्ज


युएसडीएच्या मते यंदा ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन वाढेल. मात्र या दोन्ही देशांमध्ये यंदा ला निना स्थितीचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळं उत्पादनाचे अंदाज चुकण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही देशांमध्ये सोयाबीनची पेरणी सुरु आहे. तर अमेरिका आणि भारतातील सोयाबीनचा हंगाम सुरु झाला. युएसडीनं अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन यंदा गेल्यावर्षीपेक्षा ३३ लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील हंगामात अमेरिकेत १ हजार २१५ लाख टन सोयाबीन उत्पादन झालं होतं. तर यंदा १ हजार १८२ लाख टनांवर उत्पादन स्थिरावण्याची शक्यता आहे.
ब्राझील आणि अर्जेंटीनातील पिकाबाबत लगेच काही सांगता येणार नाही. तसंच चीनची सोयाबीन खरेदी आता वाढली आहे. मात्र नेमकं अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटलं. त्यामुळं जागतिक बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात तेजी आली आहे. याचा फायदा भारतीय सोयाबीनलाही मिळतो आहे.

सध्या देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ८०० रुपये दर मिळतो आहे. सोयाबीनचे दर आणखी काही दिवस सरासरी किमान ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

हे पहा – Solar Panel subsidy: घरावर सोलर पॅनल बसवा आणि शासनाकडून अनुदान मिळवा दुसऱ्या टप्यासाठी अर्ज सुरु 2022

Leave a Comment