Whatsapp ग्रुप जॉईन करा

Ration Card या रेशन धारकांना खुशखबर मिळणार धान्याऐवजी रोख रक्कम; निकष व जिल्हे कोणते जाणून घ्या…

Webpage Timer
Time Spent on Site: 0s
Ration Card
Ration Card

Ration Card आत्महत्या केलेल्या चौदा जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

यापूर्वी या लाभार्थ्यांना शासन दरमहा बारा रुपये किलो गहू आणि तेरा रुपये किलो तांदूळ या दराने पुरवठा करत असे.

Ration Card

यासाठी राज्य सरकार केंद्राकडून गहू आणि तांदूळ अनुक्रमे 22 आणि 23 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करत असे. मात्र, यापुढे गहू आणि तांदूळ मिळणार नसल्याचे अन्न महामंडळाने स्पष्ट केले होते.

त्यामुळे सरकारने रोखीने पैसे देण्याचा पर्याय स्वीकारला. आता दरमहा 150 रुपये प्रति सदस्य महिला कुटुंबप्रमुखाच्या खात्यात जातील. आधारभूत किमतीत वाढ झाल्यानंतर ही वाढ लागू होईल. त्यासाठी दरमहा ५९ कोटी ९६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना फक्त औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशीम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी लागू असेल.

2 thoughts on “Ration Card या रेशन धारकांना खुशखबर मिळणार धान्याऐवजी रोख रक्कम; निकष व जिल्हे कोणते जाणून घ्या…”

Comments are closed.