Police Recruitment : मैदानी चाचणी संपली, लेखी परीक्षा या तारखेला होणार…

Floating Telegram Join Channel
Police Recruitment

Police Recruitment पुणे शहर पोलिस दलात भरती प्रक्रिया सुरू असून, शुक्रवारी इच्छुक उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाली. त्यानंतर पोलीस हवालदार पदासाठी 2 एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती पोलीस दलाकडून देण्यात आली.

दरम्यान, या भरती प्रक्रियेत प्रथमच पाच तृतीयपंथी सहभागी झाले आहेत.

Police Recruitment

पुणे शहर पोलिस दलासाठी ‘पोलीस भरती-2021’ प्रक्रिया 3 डिसेंबरपासून सुरू झाली. इच्छुक उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर शारीरिक चाचणीसाठी मैदानी चाचणी घेण्यात आली.

उत्तीर्ण उमेदवारांची गुणवत्ता यादी पाच-सहा दिवसांत जाहीर केली जाईल, अशी माहिती पोलिस मुख्यालय अधिकारी दशरथ हटकर यांनी दिली. दरम्यान, गृहविभागाच्या परिपत्रकानुसार पोलीस चालक पदाची लेखी परीक्षा २६ मार्च रोजी होणार असून, पोलीस हवालदार पदासाठी २ एप्रिल रोजी परीक्षा होणार आहे.

पोलीस भरतीसाठी पाच तृतीयपंथीयांचा सहभाग

9 डिसेंबर 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांना पर्याय देण्यात आला. पुणे शहर पोलीस दलात कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर भरतीसाठी नऊ तृतीयपंथी अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र एका महिला उमेदवाराने चुकून अर्ज भरला होता. उर्वरित आठ तृतीयपंथी उमेदवारांपैकी पाच उमेदवार शुक्रवारी (17) मैदानी चाचणीत सहभागी झाल्याची माहिती पोलिस मुख्यालयाने दिली.

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा