pm kisan 13th installment date प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान सन्मान निधी) तेरावा हप्ता बळीराजाच्या खात्यात या महिन्यात जमा केला जाईल.
केंद्र सरकारने या योजनेतील तेरावा हप्ता २७ फेब्रुवारी रोजी खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या योजनेचा लाभ फक्त आधार लिंक केलेल्या बँक खात्यातच जमा केला जाईल. आधार सीडिंग प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन आधार सीडिंग eKYC (eKYC PMKisan), महा-ई-सेवा केंद्र ऑपरेटरची मदत घ्यावी किंवा भारतीय पोस्ट विभागामार्फत IPPB (इंडियन पोस्ट पेमेंट बँक) मध्ये बँक खाते उघडावे.
pm kisan 13th installment date
ज्या शेतकऱ्यांनी EKYC केलेले नाही त्यांनी त्यांच्या बँकेत जाऊन EKYC पूर्ण करावे किंवा महा ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी किंवा त्या शेतकऱ्यांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत बँक खाती उघडावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रधानमंत्री किसान योजनेचे नोडल अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.
आयपीपीबी (इंडियन पोस्ट पेमेंट बँक) मध्ये प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाती नव्याने उघडल्यानंतर ते पुढील ४८ तासांत आधारशी जोडले जातील अशी माहिती त्यांनी दिली. सर्व प्रयत्न करूनही ई-केवायसी न झाल्यास पंतप्रधान किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी आयपीपीबी (इंडियन पोस्ट पेमेंट बँक) मध्ये बँक खाती उघडावीत जेणेकरून कोणताही लाभार्थी या योजनेच्या लाभांपासून वंचित राहणार नाही, असेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. योजना
पीएम किसान योजना ही एक केंद्रीय योजना आहे, जी देशातील सर्व जमीनधारक शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित कामांसाठी तसेच घरगुती आर्थिक गरजांसाठी सहाय्य प्रदान करते. शेतकर्यांना सन्मानपूर्वक जीवन मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या लाभार्थ्यांची संपूर्ण आर्थिक जबाबदारी केंद्र सरकार उचलते.
तुमची स्थिती कशी तपासायची?
- pmkisan.gov.in ला भेट द्या.
- होमपेजवरील ‘फार्मर्स कॉर्नर’ विभागाअंतर्गत ‘लाभार्थी स्थिती’ पर्याय निवडा.
- नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा
- ‘डेटा मिळवा’ वर क्लिक करा.
- हप्त्याची स्थिती कळेल.