Whatsapp ग्रुप जॉईन करा

MSRTC : एस. टी. मध्ये सर्व महिलांना आता अर्धे तिकीट.

Webpage Timer
Time Spent on Site: 0s
MSRTC

MSRTC राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न शिंदे सरकारकडून करण्यात आला. तसेच या अर्थसंकल्पातून देवेंद्र फडणवीस यांनी महिला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.

महिलांसाठी MSRTC प्रवासात 50 टक्के सवलत

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलत जाहीर केली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीस्कर प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ” कालच महिला दिन साजरा झाला. महिला सक्षमीकरणाच्या जोरावरच देशाची प्रगती ठरते. त्यासाठी चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे’, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही नवीन योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हे वाचा- जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क या 7 कागदपत्रांच्या द्वारे सिद्ध करता येणार हे 7 पुरावे नेमके कोणते आहेत

महिलांसाठी ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना

शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. तसेच लैंगिक शोषणातून मुक्त झालेल्या, कौटुंबिक समस्या असलेल्या महिलांसाठी ‘स्वाधार’ आणि ‘उज्वला’ या दोन योजनांचे एकत्रीकरण करून केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेत पीडित महिलांना निवारा, कायदेशीर सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन आणि इतर सेवा पुरविल्या जातील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.