mahadbt portal महाराष्ट्र राज्यात कृषि विषयक २५ पेक्षा अधिक योजनांचा लाभ महाडिबीटी पोर्टलद्वारे शेतक-यांना ऑनलाईन पद्धतीने मिळत आहे. शेतक-यांना महाडिबीटी पोर्टलवर विविध घटकांसाठी अर्ज करण्यापासून ते अनुदानाचा लाभ मिळणेपर्यंत portalhttps://mahadbtmahait.gov.in/Farmer/login/login या URL चा उपयोग केला जात होता. परंतु महाडिबीटी पोर्टलवरील तांत्रिक कारणास्तव पोर्टलच्या URL मध्ये बदल करण्यात आलेला आहे.
नवीन URL पाण्यासाठी इथे क्लिक करा
नवीन URL https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/login/login याप्रमाणे राहील, तरी नवीन URL बाबत क्षेत्रिय स्तरावरील कृषि कार्यालय तसेच पंचायत समिती कार्यालयांनी नवीन URL बाबत प्रसिद्धीपत्रक दर्शनी भागावर प्रसिद्ध करण्यात यावे. तसेच महाईसेवा केंद्रे, गावपातळीतील बैठका, गावातील कृषिफलक यांच्याद्वारे शेतक-यांना नवीन URL बाबत माहिती प्रसारित करावी. राज्यातील सर्व शेतक-यांना सदर परिपत्रकाद्वारे आवाहन करण्यात येते की, नवीन URL वरील महाडीबीटी पोर्टलवर जाऊन शेतकरी योजना या सदराखाली विविध लामाच्या घटकांसाठी नोंदणी करावी.
mahadbt portal
