Whatsapp ग्रुप जॉईन करा

LPG Subsidy Ujjwala Yojana मोठी बातमी! गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर, ‘इतके’ रुपये अनुदान मिळणार?

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

LPG Subsidy Ujjwala Yojana गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदी, (सोन्याचांदीचा दर), पेट्रोल-डिझेल (पेट्रोल डिझेलचे दर) आणि दूध, भाजीपाला या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत दिवसेंदिवस महागाई दिसून येत आहे.

त्यामुळे घरगुती सिलिंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी देण्याची घोषणा केली आहे.

LPG Subsidy Ujjwala Yojana

अनुदान देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. मात्र आता केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नवीन अधिसूचनेनुसार, उज्ज्वला योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांना 14.2 किलो LPG गॅस सिलिंडरवर प्रति वर्ष 200 रुपये सबसिडी मिळेल. तसेच, सरकारने वर्षभरात 12 सिलिंडर भरण्याची परवानगी दिली आहे. म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाने एका आर्थिक वर्षात 12 स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर 200 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी मंजूर केली आहे.

LPG Subsidy Ujjwala Yojana

दरम्यान, या घोषणेमुळे सरकारवर 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 6 हजार 100 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. त्यामुळे 2023-24 या वर्षासाठी सरकारवर 7 हजार 830 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या महिन्यात केंद्र सरकारने विनाअनुदानित 14.2 किलोच्या सिलेंडरमध्ये 50 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत एलपीजीची किंमत प्रति युनिट 1,103 रुपये झाली आहे. त्याच वेळी, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 350.50 रुपयांनी वाढून 2,119.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.

या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे

सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये अनुदान एक वर्षासाठी वाढवले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईच्या विळख्यातून काहीसा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हे अनुदान मंजूर करण्यात आले. सर्व प्रमुख भारतीय तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) 22 मे 2022 पासून सबसिडी देत आहेत.