Know Your Ration: तुमच्या हक्काचे रेशन किती मिळते? माहित नसेल तर तुमच्या मोबाईल वर पाहू शकता

Floating Telegram Join Channel

Know Your Ration अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत रेशनकार्डद्वारे गरिबांना मोफत धान्य वाटप केले जाते. यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) कार्यरत आहे. यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने ‘ई-पॉस’ ही ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे. याद्वारे शिधापत्रिकाधारकांना किती धान्य मिळते याची माहिती दिली जाते. त्या बद्दल…

Know Your Ration

‘ई-पीओएस’ म्हणजे ‘इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल’ प्रणाली. ही केंद्रीय यंत्रणा असून रेशनकार्डधारकाला किती आणि कधी धान्य वाटप झाले याची माहिती मिळते. त्यासाठी शिधापत्रिकाधारकाचे आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. ही प्रणाली राज्यात सर्वप्रथम जानेवारी २०१७ मध्ये लातूर जिल्ह्यात सुरू करण्यात आली. त्यानंतर राज्यात ही योजना लागू करण्यात आली.

यंत्रणेची कार्यपद्धती know your ration card maharashtra

शिधापत्रिकेवरील कोणताही सदस्य रेशन दुकानावर ‘ई-पॉस’ ला अंगठा देऊन रेशन गोळा करू शकतो. अंगठा दिल्यानंतर मशीनमधून पावती दिली जाते. त्यावर धान्य वितरणाची संपूर्ण माहिती दिली आहे. काही कारणाने अंगठा जुळत नसल्यास ‘आयरीस’ (डोळे) देखील वापरता येतात.

धान्य मिळाले हे कसे कळेल?

 • तुम्हाला किती रेशन मिळते हे तपासण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक आवश्यक आहे.
 • मग तुमच्‍या मोबाइल APP डाउनलोड लिंकमध्‍ये प्ले स्टोअरवरून मेरा राशन APP डाउनलोड करा – येथे क्लिक करा
 • मग हे अॅप तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करा. APP लॉन्च करताना, तुम्हाला लोकेशन चालू करण्यास सांगितले जाईल.
 • आता काही फोटो स्क्रीनच्या वर दिसतील त्यांना बाजूला सरकवा.
 • आता तुम्हाला स्क्रीनच्या वरती अनेक पर्याय दिसतील Know Your Entitlement या पर्यायावर क्लिक करा.
 • येथे तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक असे दोन पर्याय दिसतील. आधार क्रमांकावर क्लिक करा.
 • तुमचा 12 अंकी आधार क्रमांक एंटर करा आणि खालील सबमिट बटणावर क्लिक करा.
 • शासकीय नियमानुसार खरेदी करून किती धान्य मिळावे आणि मोफत योजनेत किती धान्य मिळावे याची सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल.
 • आता येथे तुम्ही रेशन दुकानदार तुम्हाला किती धान्य देतो हे जाणून घेऊ शकता. या अॅपमध्ये दिलेल्या माहितीशी त्याची तुलना करा, तफावत आढळल्यास तुम्ही रेशन दुकानदाराला तहसील कार्यालयात तक्रार करू शकता.

हे लक्षात ठेव…

 • अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत फक्त गहू आणि तांदळाची हमी आहे. इतर धान्य, डाळी, साखर, खाद्यतेल उपलब्धतेनुसार आणि वेळोवेळी बदलणाऱ्या सरकारी धोरणानुसार दिले जाते.
 • ऑनलाइन धान्य माहिती आणि वास्तविक धान्य यांच्यात तफावत आढळल्यास, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात किंवा helpline.mhpds@gov.in या ई-मेलद्वारे किंवा 1800224950 या क्रमांकावर त्वरित तक्रार नोंदवता येईल.
WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा