Whatsapp ग्रुप जॉईन करा

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana योजनेद्वारे 2 लाखापर्यंत मिळणार शेतकऱ्यांना विमा तात्काळ आपला अर्ज करा

Webpage Timer
Time Spent on Site: 0s


Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आपण आज गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या परिस्थितीत किती विमा सरकारकडून मिळणार आहे, तसेच कोणत्या कारणास्तव विमा दिला जाणार आहे. तसेच कधी विम्याचा लाभ घेता येणार नाही. विम्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे ,पात्रता , मिळणारी रक्कम आणि लागू असणाऱ्या अटी , शासन निर्णय कोणत्या कारणास्तव लाभ मिळणार, अर्ज कुठे करायचा , कोणत्या विमा कंपनी द्वारे विमा मिळेल यांची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.


हे नखी वाचा -महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, “या” नागरिकांना आजपासुन एस टी चा प्रवास मोफत करता येणार.



राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास आता शासन मदतीसाठी धावले आहे. अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते.शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा कालावधी 1 डिसेंबर 2016 ते 30 नोव्हेंबर 2017 असा असून दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत आहे.



शेती संबंधित विविध योजनांची माहिती मिळविण्यासाठी खलील लिंकवर टच करा. आमच्या  ग्रुपमधे सामील व्हा

इथे क्लिक करा



Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra 2022



या कालावधीसाठी राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला असून दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. अपघात होणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा प्रस्ताव विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतरही 90 दिवसापर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येईल. विम्याचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी 10 ते 75 या वयोगटातील सातबाराधारक असणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांनी अर्जाच्या नमुन्यासाठी आपल्या नजिकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करून प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजूरीसाठी पाठवितात.


या योजने चा लाभ कोणाला भेटेल


विमा संरक्षणात रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, हिस्त्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगल आणि अन्य कोणतेही अपघातांचा समावेश करण्यात आला आहे.


या योजने चा लाभ कोणाला भेटणार नाही


Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra 2022
नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा विमा संरक्षणात समावेश नाही.
अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.



अर्ज करण्यास लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ?



अ. दावा दाखल करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे असतील
• ७/१२ आणि ८-अ प्रमाणपत्र यांची मूळ प्रत
• मृत्यूचे प्रमाणपत्र
• अपघात कोणत्या कारणामुळे झाला याचा प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल.
• वयाचा दाखला ( उपलब्ध नसल्यास शपथपत्र)
• घटना स्थळ पंचनामा



असे करा अर्ज



या योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करा. आणि या योजनेची चौकशी करून अर्ज करा. आणि इतर काही या योजने संबंधी माहिती हवी असेल तर खाली कंमेंट करा. आम्ही तुम्हला हवी ती माहिती पुरवण्याची प्रयत्न करू.



गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा ?
या योजनेसाठी अर्ज करावयाचा असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करावा. शेतकऱ्याला दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा. लि. या विमा कंपन्यांकडून शेतकऱ्याला विम्याची रक्कम देण्यात येईल.



🙋🏻‍♂️मित्रानो ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा 💁🏻‍♂️📲🪀


1 thought on “Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana योजनेद्वारे 2 लाखापर्यंत मिळणार शेतकऱ्यांना विमा तात्काळ आपला अर्ज करा”

Leave a Comment