Central Railway Recruitment मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://cr.indianrailways.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सेंट्रल रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड, मुंबई द्वारे सप्टेंबर 2023 च्या जाहिरातीत एकूण 2409 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2023 आहे.
Central Railway Recruitment
एकुण: 2409 जागा
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
विभाग | पद संख्या |
मुंबई | 1649 |
भुसावळ | 296 |
पुणे | 152 |
नागपूर | 114 |
सोलापूर | 76 |
Total | 2409 |
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)
वयाची अट: 29 ऑगस्ट 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मध्य रेल्वे (महाराष्ट्र)
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 सप्टेंबर 2023 (05:00 PM)