
anganwadi sevika salary will double increase अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय या सेवकांना मोबाईल फोन देण्यात येणार आहेत. याशिवाय त्यांना पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.
अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला यश आल्याचे प्रथमदर्शनी दिसते. अंगणवाडी सेविकांच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने सरकारला आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संप पुकारला होता.
anganwadi sevika salary will double increase
या संपात अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या. विविध मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यभरात आंदोलन पुकारण्यात आले. दरम्यान, राज्य सरकारने मागण्या मान्य केल्याने हा प्रश्न बऱ्याच अंशी मिटला आहे.
अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य केल्या
अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने 20 फेब्रुवारीपासून पुकारलेल्या बेमुदत संपात अंगणवाडी सेविका-मदतनीस सहभागी झाल्या होत्या. या संपादरम्यान अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सहा वर्षांची बालके पोषण आहारापासून वंचित राहिली. याशिवाय गरोदर मातांची तपासणी, लसीकरण, कुपोषण निर्मूलन आदी उपक्रमांवरही परिणाम झाला. त्यामुळे राज्य सरकारने वेळीच चर्चेची भूमिका घेत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य केल्याने मोठा प्रश्न मार्गी लागला. राज्य सरकारच्या निर्णयानंतर अंगणवाडी सेविकांनीही आनंद व्यक्त केला.
2 thoughts on “anganwadi sevika salary will double increase अंगणवाडी सेविकांचे आता मिळणार दुप्पट पगार”
Comments are closed.