Whatsapp ग्रुप जॉईन करा

Agriculture Technology शेतीसाठी उपकरणे खरेदी करण्यासाठी सरकार देणार 80 टक्के अनुदान लगेच करा अर्ज

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

Agriculture Technology नमस्कार मित्रांनो शेती आणि फलोत्पादनासाठी कृषी यंत्रांचा वापर सातत्याने वाढत आहे. आज बहुतांश शेतकरी कृषी यंत्रांच्या सहाय्याने उत्पादन खर्च कमी करून चांगला नफा कमावत आहेत. कृषी यंत्राच्या साहाय्याने कमी वेळेत जास्त कामे करता येतात. त्यामुळे पिकाचा उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी यंत्रांचे महत्त्व आणि उपयोगिता लक्षात घेऊन सरकार कृषी यंत्रावर अनुदानाचा लाभ देते.

Agriculture Technology मित्रांनो या लेक मध्ये आपण पाहणार आहोत या योजनेसाठी अर्ज कसा करायचा व कुठे यासाठी पात्रता काय आहे अनुदान किती भेटेल तर हा लेख काळजीपूर्वक वाचा. व हा लेख तुम्हाला आवडल्यास तर इतरांना नक्की शेअर करा चला तर पाहूया.

हे पहा – या विद्यार्थ्यांना भेटणार 15000 रुपये स्कॉलरशिप असे करा अर्ज

या योजनेचे नेमके उद्देश काय (Agriculture Technology)

मित्रांनो जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.

या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल

1ट्रॅक्टर
2पॉवर टिलर
3ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
4बैल चलित यंत्र/अवजारे
5मनुष्य चलित यंत्र/अवजारे
6प्रक्रिया संच
7काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
8फलोत्पादन यंत्र/अवजारे
9वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
10स्वयं चलित यंत्रे

या योजनेसाठी पात्रता

शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल

उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
७/१२ उतारा
८ अ दाखला
खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
स्वयं घोषणापत्र
पूर्वसंमती पत्र

या योजनेसाठी अर्ज कसा करावा येथे क्लिक करून पहा

Leave a Comment