
Aaj Che Kapus bajar bhav विदर्भातील कापसाची पंढरी अशी ओळख असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या हंगामातील कपाशी खरेदी सुरु आहे. यंदा पांढऱ्या सोन्याला नऊ हजारांच्या जवळपास दर मिळत आहे. Aaj Che Kapus bajar bhav काही दिवसांपूर्वी कापसाच्या दरात घसरण झाल्याने भाव ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला. त्यानंतर कापसाचा बाजार स्थिरावला होता. आता पुन्हा पांढऱ्या सोन्याचा भाव ९ हजारांच्या जवळपास पोहचला आहे.
Aaj Che Kapus bajar bhav
अकोट बाजार समितीत शनिवारी ९ हजार ७० रुपये प्रतिक्विंटल तर काल सोमवारी ९,०९५ रूपये दर मिळाला. तर आज कापासाचा दर शंभर रुपयांनी घसरला आहे. त्याबरोबर सोयाबीनचे दरही घसरले आहेत. आगामी काही दिवसात कापसाचा दर ‘दहा’ हजारांवर पोहचणार असल्याचा अंदाज बाजार समितीचे मुख्य प्रशासक गजानन गोपाळराव पुंडकर यांनी ‘मटा ऑनलाइन’शी बोलताना वर्तवला आहे. तसेच बाजार समितीत शेतकऱ्यांची आवकही वाढलीय.

सोयाबीन च्या भावा मध्ये मोठे बदल सर्व जिल्ह्यातील बाजार भाव
👇👇👇👇👇
https://csccorner.co/soybean-rates-live/
Aaj Che Kapus bajar bhav कापसाचा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. परतीच्या पावसामुळे हंगाम लांबला होता. दिवाळीपर्यंत कापसाचे दर दबावात होते. हंगामाच्या सुरुवातीला काही दिवस कापसाचे बाजारभाव प्रतिक्विंटल ७००० ते ८००० रुपयांच्या घरात होते. दिवाळी सणानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढल्याने देशातील कापूस बाजाराला आधार मिळाला. त्याचा फायदा होऊन क्विंटलमागे जवळपास ३५० ते ४०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली होती. कापसाच्या दरातील वाढ पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे.
शनिवारी म्हणजेच ७ जानेवारीला आणि काल सोमवारी ८ हजार ४०० ते ९ हजार ९५ रूपये इतका कापसाचा भाव मिळाला. कालपर्यत ९ हजार रुपयांचा टप्पा कापसाने गाठला. मात्र आज मंगळवारी म्हणजे १० जानेवारीला अकोट कृषी बाजारात कापसाला ८ हजार ४०० ते ८ हजार ९०५ इतका भाव आहे. शंभर रुपयांनी हा दर घसरला आहे.

असा आहे कापसाचा सरकारी दर
कापूस खरेदीचा सरकारी दर ६ हजार ३३० रूपये असा आहे. परंतू, अकोल्यातील अकोटमध्ये आज कापसाला ८ हजार ४०० पासून ८ हजार ९०५ रूपये इतका भाव मिळाला. आतापर्यंत अकोट बाजार समितीमध्ये ९२ हजार ७३४ क्विंटलहून अधिक कापूस खरेदी झाला आहे. दरम्यान तरीही कापसाचे दर स्थिर राहणार असून आगामी काही दिवसात कापूस १० हजार टप्पा गाठणार आहे, अशी शक्यता जाणकार वर्तवत आहे. त्यामुळ शेतकऱ्यांचा वाट पाहण्याचा निर्णयच योग्यचं, असेही म्हणायला हरकत नाही.
2 thoughts on “Aaj Che Kapus bajar bhav आजचे कापूस बाजारभाव 2023”